कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागात डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची आरोग्य सेवा

शरद पवारांनी दिली आरोग्य शिबिराला भेट

0

मानोरा: महापुरानंतर रोगराई पसरण्याचा धोका असतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) हे आपल्या चमूसह पूरग्रस्तांच्या उपचारासाठी रवाना झाले होते. मंगळवारी व बुधवारी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या शिबिराला शरद पवार यांनीही भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

सोमवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दोन डॉक्टर, दोन फार्मसिस्ट व दोन मदतनीस अशी टीम घेऊन डॉ. श्याम जाधव (नाईक) मानोरा येथून पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा देण्यासाठी रवाना झाले होते. बुधवारी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कवठे सार तालुका शिरूळ येथे पूरग्रस्ताना आरोग्य सेवा दिली. त्यांचे पाहिले आरोग्य शिबिर नरांदे , जयसिंगपूर तालुका शिरुळ येथे पार पडले. या शिबिरात हजारों रुग्णांनी उपचार करून घेतले. यावेळी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी पुरवण्यात आली.

शरद पवारांनी दिली आरोग्य शिबिराला भेट
बुधवारी कवठेसार येथील आरोग्य शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस केली तसेच पूर परिस्थितीचा आढावा घेतला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीचं संकट येते तेव्हा तेव्हा संपूर्ण राज्य पाठीशी उभे राहते. कारंजा सारख्या भागातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून फक्त आरोग्य सेवेसाठी डॉक्टर चमू घेऊन येतात ही खूप आशादायी बाब असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

स्थिती पूर्ववत येईपर्यंत आरोग्य सेवा सुुुुरू राहणार – डॉ श्याम जाधव (नाईक

पूर आल्यानंतरही पूर ओसरल्यानंतरची परिस्थिथी अधिक गंभीर असते. दुषीत पाणी, चिखल, मृत जनावरे इत्यादींमुळे रोगराई पसरून जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. इथली परिस्थिती गंभीर आहे. एकीकडे उद्धवस्त झालेला संसार लोकांना सावरायचा आहे तर दुसरीकडे त्यांना त्यांचं आरोग्याची काळजी घ्यायची आहे. पूरग्रस्तांना कोणताही संसर्गजन्य रोग होऊ नये तसेच त्यांना रोगांची लागण होऊ नये यासाठी त्यांना आवश्यक तो औषधीसाठी पुरवण्यात आला आहे. 

या शिबिरात डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्या सोबत डॉ. फैजल, डॉ. वानखेडे, डॉ. महिंद्रे तसेच दोन फार्मसिस्ट व दोन मदतनीस पूरग्रस्त भागांचा दौरा करून त्यांना आरोग्य सेवा देत आहे. परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.