कुपटा येथे मोफत स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

किसनभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन

0

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील कुपटा येथे शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी कुपोषीत बालक, स्तनदा माता व गरोदर माता तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात सुमारे 373 गरोदर व स्तनदा माता व बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना मोफत औषधीचे वितरणी करण्यात आले. डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्याद्वारे पोहरादेवी-उमरी खु. तीर्थक्षेत्राचे आधारस्तंभ तसेच समाजभूषण व भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले.

याप्रसंगी डॉ. श्याम जाधव नाईक यांनी किसनभाऊ राठोड यांच्या दीर्घआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे. गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व मूल या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते. पावसाळ्यात अनेक रोगांची लागण होते त्यामुळे गर्भवती मातांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच कुपोषीत बालकांना सकस आहार देणे आवश्यक आहे. असेही डॉ. श्याम जाधव (नाईक) म्हणाले.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!