सुप्रसिद्ध भुशी डॅमवर पर्यटकांना बंदी

पाय-यावर न जाण्याचं पोलिसांचं आवाहन

0

पुणे: लोणावळा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पाय-यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या 48 तासाच्या पावसाने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर पर्यटकांना पायऱ्यांवर सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सहकार्य करण्याचं आवाहनही पोलिसांनी पर्यटकांना केलं आहे.

दोन दिवसांत लोणावळ्यात 312 मिमी पाऊस झाला असल्याने ओव्हर फ्लो झालेल्या भुशी धरणाच्या पायर्‍य‍ांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. पाण्याला वेगदेखील जास्त असल्याने पायर्‍य‍ांवर उभे राहणे धोकादायक असल्याने पोलीस प्रशासनाने धरणाच्या पायर्‍यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव केले आहे.

दरम्यान, भुशी धरण, लायन्स पॉईंट, सहारा पूल धबधबा परिसरात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन नंतर भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच वलवण व खंडाळा येथील एन्ट्री पॉईंटपासून अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजण्याच्यादरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.