लाऊडस्पीकरसाठी परवानगीच्या निर्णयाचे स्वागत – मोहित कंबोज

मदरसे व अनधिकृत मशिदीवरच्या लाऊडस्पिकरवरही कारवाई करा, कंबोज यांची मागणी

मुंबई: मंदिर असो किंवा मशिद यावर लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावे लागणार असा निर्णय आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला. सरकारच्या या निर्णय़ाचे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी स्वागत केले आहे. यासह त्यांनी मदरसे व अनधिकृत मशिदीवरचे लाऊडस्पिकर काढावेत तसेच येणा-या काळात मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी जी नियमावली केली जाणार आहे तिच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकरबाबतही लागू करावी अशीही मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

या विषयावर बोलताना मोहीत कंबोज म्हणाले की 80 टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत. तर 20 टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर लावलेले आहेत. मदरशांवरील लाऊडस्पीकर हे काढून टाकले पाहिजेत. शिवाय ज्या मशिदी अनधिकृत आहे तिथे देखील लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देऊ नये. याबाबत सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. असेही कंबोज म्हणाले.

सुप्रीम कोर्टाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे आणि मशिदीवरील अनधिकृत भोंगे हे उतरवावे आणि याची सुरुवात मुंबईतून होईल व पुढे मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल. असेही ते म्हणाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.