सोशल मीडियात मोहम्मद कैफवर टीका

का करत आहे लोक मोहम्मद कैफवर टीका ?

0

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफवर सध्या सोशल मीडियातून चांगलीच टीका होत आहे. मोहम्मद कैफने त्याच्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. कैफने मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. कैफने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच काही जणांनी त्याच्या फोटोवर कमेंट करून त्याच्यावर टीका केली आहे.

बुद्धीबळ खेळणं इस्लाम धर्माच्या विरोधातील असल्याचं मत नेटीझन्सने कमेंटमधून व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी बुद्धीबळ खेळणं हराम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. कैफवर सोशल मीडियावर टीका होत असताना काही नेटीझन्सने कैफला समर्थनही दर्शविलं आहे.

कैफवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मोहम्मद कैफवर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार झाला होता. सुर्यनमस्कार करतानाचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. सुर्यनमस्कार करतानाच्या फोटोवर त्याने दिलेलं कॅप्शन आक्षेपार्ह असल्याचं काही जणांनी म्हंटलं होतं. तर टी-शर्ट आणि पॅन्ट घालणं, हे इस्लाम विरोधातील असल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं होतं.

इस्लाम धर्मात सुर्यनमस्कार करण्याला 100 टक्के मनाई आहे. आपण ‘अल्लाह’ व्यतिरिक्त इतर कोणासमोरही झुकू शकत नाही, असं मत काही कट्टरतापंथीयांनी व्यक्त केलं होतं.

(हे पण वाचा: विराट कोहलीला बीसीसीआयचा नोकरी सोडण्याचा आदेश)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.