पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीचे बॅडमिंटन खेळाडू चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तुर्नामेंटमध्ये चमकलेत. विविध गटात झालेल्या स्पर्धेतील विजेतेपद वणीच्या खेळाडुंनी खेचून आणले. हे सर्व खेळाडू पवन ढवस बॅडमिंटन अकादमीचे खेळाडू आहेत. चंद्रपूर येथे शनिवारी व रविवारी जिल्हास्तरीय चिल्ड्रेन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा बॅटमिंटन डेव्हलपमेन्ट असोसिएशनद्वारा या तुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते.
अंडर 9 वयोगटात स्वर्निल जमनाके हा सिंगलमध्ये विजेता ठरला. तर साई तुराणकर हा अंडर 11 व 13 या वयोगटात विजेता ठरला. मुलींच्या डबल्समध्ये गार्गी पिसे व तानी पोद्दार यांनी विजेतेपद पटकावले. तर अद्वय खाडे, सुहावी मुसळे, आरोही ढेंगळे, सक्षम पोद्दार, संग्रीत भगत, हार्वी उपरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपांत्य फेरी गाठली.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. खेळाडुंनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षक पवन ढवस यांना दिले. विजेत्या खेळाडुंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वणीतील वडगाव रोड येथील नगर पालिकेच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये प्रशिक्षक पवन ढवस हे खेळाडुंकडून कठोर सराव करून घेत आहे.
खेळाडुंना डॉ. जुमनाके, सागर ढवणे, मनीष चौधरी, निकेश माकडे, हितेश राऊत, विजय बिलोरिया, कुणाल सुंकुरवार, संतोष बेलेकर, डॉ. खाडे, डॉ. मुसळे, ढेंगळे, अजिंक्य मत्ते, अंकुश ढवळे यांचे वेळोवेळी सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
Comments are closed.