विलास ताजने, वणी : देशात सुरू असलेल्या प्रो कबड्डी सीझन सिक्सच्या अंतीम सामन्याचा शेवट अतिशय चुरशीत झाला. बेंगलूर बुल्स आणि गुजरात फार्चून जॉइन्ट्स या दोन संघा दरम्यान मुंबईत झालेल्या सामन्याचे अंतिम गुण ( ३८-३३ ) होते. सामन्याच्या मध्यंतरापूर्वी गुजरात संघाने आघाडी घेतली होती. मात्र मध्यंतरापूर्वी केवळ ४ गुण मिळवणाऱ्या बेंगळुरू संघाच्या पवनने मध्यंतरानंतर १८ गुण खेचून संघाला विजयश्री प्राप्त करून दिली.