सोशल डिस्टन्सिंगची आमदारांकडूनच ऐसी तैसी

आमदार व त्यांच्या सहका-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

जब्बार चीनी, वणी: एकीकडे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सरकार, पोलीस प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील लोकप्रतिनिधीच या नियमांना बगल देत असल्याची उदाहरणं पाहायला मिळत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला धुडकावून लावणारी अशीच एक घटना वणीत समोर आली आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडून तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. 19 मेला आमदार आणि भाजपच्या काही पदाधिकारीतर्फे एसडीओला निवेदने देण्यात आले होते. त्यावेळी आमदारांकडूनच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विवेक मांडवकर यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

कोराना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणुन दि. 19 मे ला आ. संजीवरेडडी बोदकुरवार हे निवेदन देण्याकरीता आपल्या दहा ते पंधरा कार्यकत्यांसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित झाले व कार्यकत्र्यांसह सोशल डिस्टंसींगचे कोणतेही भान न ठेवता उपविभागीय अधिकारी यांचे कक्षात प्रवेश करुन निवेदन दिले.

हाच तो निवेदन देतानाचा फोटो

उत्साहाच्या भरात भाजपकडून फोटो व्हायरल
याप्रसंगी काढण्यात आलेले छायाचित्र भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांतर्फेच व्हायरल करण्यात आले होते. मात्र हे चित्र सोशल मिडीयावर प्रसारीत होताच सोशल मीडियावर याबाबत चांगलीच टीका करण्यात आली होती. काँग्रेसही याबाबत आक्रमक झाली. आमदारच सोशल डिस्टसींगचे पालन करीत नसल्याने वणी शहर काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारीयांचे कडे तक्रार केली व आ. बोदकुरवार यांचेसह उपस्थित सहकार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सद्या महाराष्ट्रात व आपल्या जिल्ह्यात कोव्हीड -19 ह्या व्हायरसने थैमान घातले आहे. त्यापासुन बचाव म्हणून सरकारने अनेक मानकांची घोषणा केली आहे. त्या मानकांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार व त्यांचे सहकारी यांनी आपल्या कार्यालयात अर्ज देते वेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे उल्लंघन केले. सदर नियमाचे पालन न केल्यामुळे नियमाचे भंग झाले आहे.

दारू प्रकरणात आमदारांचाच गवगवा
वणी शहरात मागील काही दिवसापासुन सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडत असल्याचा गवगवा केल्या जात होता. मदयविक्री सुरु असतांना सोशल डिस्टंसींगचे पालन होत नसल्याची तक्रार आमदारांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती. मात्र आता चक्क आमदारांनाच सोशल डिस्टन्सिंचा विसर पडल्याचे दिसत आहे,

कोरोना विषाणूजन्य आजाराचा मोठया प्रमाणात प्रसार होत असल्याने याला प्रतिबंध घालण्याकरीता शासनाने अनेक मानकांची घोषणा केली आहे. यामध्ये नागरीकांनी सार्वजनीक ठिकाणी वावरतांना 1 मिटर अंतर ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत तर मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणा-यां नागरीकांवर आपत्ती निवारण कायदयान्वये कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई मुळे अनेक नागरीकांनी प्रशासना विरुध्द नाराजी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.