बहुगुणी डेस्क, अमरावती: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवार 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अत्यंत साधेपणाने साजरी करणार आहे.
सोशल डिस्टंसिंग आणि शासनाने घालून दिलेल्या निमयांचे तंतोतंत पालन केले गेले. दस्तुरनगर जवळील कलोतीनगर स्थित सिंफनी स्टुडिओत यांचे रेकॉर्डिंग झाले. सिंफनी ट्यून्स या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबूक लाईव्हवरती हा कार्यक्रम 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता सर्वांना मोफत बघता येईल.
‘बा भीमा’ या मैफलीत जयंत वाणे, गोपाल सालोडकर, कामिनी खैरे, गुरूमूर्ती चावली, शीतल भट आणि प्रा. पंकज गजभिये गायन करतील. या मैफलीचं आशयगर्भ आणि अभ्यासपूर्ण निवेदन अॅड. वैशाली वाणे करणार आहेत. संगीत संयोजन सुनीत बोरकर, कीबोर्डची साथ सचिन गुडे, तालवाद्यांची साथ विशाल पांडे यांनी केली.
तंत्रदिग्दर्शनासह चित्रिकरण अमीन गुडे यांनी केलं. कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना जयंत वाणे आणि अॅड. वैशाली वाणे यांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रम सुरू होईल. अधिक माहितीकरिता 9822643316, या नंबरवर संपर्क साधावा. ही विनंती आयोजन प्रमुख जयंत वाणे, अॅड. वैशाली वाणे आणि सिंफनी गृपचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी केली आहे.
खाली दिलेल्या Symphony Studio च्या लिंकवर विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता