राजुरा विधानसभेत ‘आमचं जमलंय’ची चर्चा जोमात

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर सुदर्शन निमकर यांच्या प्रचारकार्याला जोर

0

राजुरा: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क दौरा सुरू आहे. यात आता माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांनी ‘आमचं जमलंय’ ही टॅगलाईन घेऊन जनसंपर्क दौरा सुरू केला आहे. उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठींकडून कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याने सुदर्शन निमकर यांनी जनसंपर्क दौ-याचा धडाका लावला आहे. त्यांच्या या झंझावातामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्तेही आता कामाला लागले आहे.

गेल्या काही दिवसांआधी सुदर्शन निमकर यांनी जनसंपर्क यात्रेला सुरूवात केली आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघातील खेडो पाडी भेट दिली आहे. त्यांच्या या यात्रेला कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेचाही चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन व बुथ सदस्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. पक्षश्रेष्ठींनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्तेही कामाला लागले आहे.

‘आमचं जमलंय’ची चर्चा जोमात 
‘आमचं जमलंय’ ही टॅगलाईन घेऊन सध्या सुदर्शन निमकर यांची जनसंपर्क यात्रा सुरू आहे. ही टॅगलाईन लोकांच्या पसंतीस उतरत असून सध्या याची राजुरा मतदारसंघात चांगलीच चर्चा मतदारसंघात रंगत आहे. यात्रेदरम्यान लोकांचा या टॅगलाईनला चांगलाच प्रतिसाद मिळत असून आता खेडोपाडीही लोक ‘आमचं जमलंय’ म्हणत प्रचाराला लागले आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद यात्रेला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राजुरा तालुका अध्यक्ष हरिभाऊ झाडे वि.मा.शि.चे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशवराव ठाकरे, युवा कार्यकर्ता आदित्य भाके, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुरेश पावडे, युवक अध्यक्ष नवनाथ पिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.