सिंफनी ग्रुपच्या ‘जिंदगी मिलके बिताएंगे’ संगीत मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

सिंफनी गृप ऑफ म्युझीक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टचे आयोजन

0

बहुगुणी डेस्क, अमरावती:जिंदगी मिलके बिताएंगे’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन हॉल येथे झाली. विविध बहारदार गीतांतून जीवनातली सकारात्मकता मांडण्याचा प्रयत्न सिंफनी गृप ऑफ म्युझीक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. हे मैफलीचे हे दुसरे पर्व होते. सिंफनी गृप वर्षभर विविध सांगितिक आणि सामाजिक उपक्रम राबवित असतो. नावीन्यपूर्ण संगीतमैफलीतला एक वेगळाच प्रयोग होता. रसिकांनी या मैफलीला भरभरून दाद दिली.

सिंफनी गृपचे पदाधिकारी सचिन गुडे, गुरूमूर्ती चावली, जयंत वाणे, डॉ. नयना दापूरकर, दीपक खंडेलवाल, डॉ. नितीन उंदे, राजा डेंडुले, जितू कुरवाणे, स्नेहल शेंडे, पल्लवी राऊत, अभियंता महेश कोकाटे, प्रा. आनंद देशमुख, शीतल भट, प्रा. डॉ. आशीष बर्डेकर, डॉ. प्रमोद होले, डॉ. हरीश काळे, प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, खुशी गणोरकर यांनी ही मैफल गाजविली.

 

डॉ. नयना दापुरकर यांनी गायलेल्या ‘हम थे जिनके सहारे’ या गीताने मैफलीचा आरंभ झाला. नितीन उंदे यांनी ‘तेरी निगाहो पे मरमर गये हम’ हे गीत आपल्या वेगळ्या अंदाजात पेश केलं. पल्लवी राऊत यांनी गायलेल्या ‘दिल तो है दिल’ या गीताने मैफलीचा समा बांधला. डॉ. प्रमोद होले यांनी  ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने’ हे गीत सादर केले. अभियंता अजय विंचुरकर यांनी ‘एक रोज मैन तडप कर’ हे गाणं प्रस्तुत केलं. स्नेहल शेंडे यांनी ‘तेरा जना दील के अरमानो का’ या गाण्यातून रसिकांना मंत्रमुग्ध केलं.

गुरुमूर्ती चावली आणि शीतल भट युगलगीत सादर करताना

डॉ. हरीश काळे  यांनी ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यातून उत्साही माहोल तयार केल. वैशाली वऱ्हाडे यांच्या ‘मेरे खाबो में जो आये’ या गीताने मैफलीत जान आली. ‘बिते हुये लम्हों की कसक साथ तो होगी’ हे राजा डेंडुले यांनी गायलेलं गीत रसिकांच्या पसंतीस उतरलं. शिरिषा गुरूमूर्ती चावली यांनी ‘दो लब्जो की है दिल की कहानी’ या गाण्यांतून सुरांची मनोहारी पेरणी केली. जयंत वाणे यांच्या ‘लाई भी ना गई ते निभाई भी ना गई’ या गीताने मैफलीत रंग चढला.

जितू कुरवाणे यांच्या ‘गम का फसाना बन गया’ या गीताला रसिकांनी मनातून दाद दिली. गुरुमुर्ती चावली यांनी ‘कहा से आये बदरा’ या गाण्यातून रसिकांची मनं जिंकलीत. दीपक खंडेलवाल यांनी ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है’ या गीतातून जणू जीवनावर भाष्यच केलं. प्रा. डॉ. आशीष बर्डेकर यांनी ‘आज हमे मालूम हुआ’ हे गीत गायलं.

दीप प्रज्वलन करताना डॉ. प्रमोद होले, डॉ. प्रशांत ठाकरे, दीपकजी खंडेलवाल, गजानन देऊळकर, अभि. अजय विंचूरकर आणि डॉ. नितीन उंदे, पीटर गायकवाड

खुशी गणोरकर यांनी ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या गीताला एका वेगळ्या उंचीवर नेलं. अभियंता महेश कोकाटे यांनी ‘धडकन जरा रुक गई है’ हे गीत तर प्रा. आनंद देशमुख यांनी ‘कुछ मेरे दिल ने कहा’ ही गाणी गायलीत. शीतल भट यांच्या ‘जा रे जा उड जा रे पंछी’ या गाण्यातून रसिकांना स्वरानंद घेता आला.

प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांचं ‘वादा करो नही छोडोगे तुम’ हे गीत चित्तवेधक ठरलं. यासोबतच ‘रोज शाम आती है’, ‘मेरे दोस्त किस्मात से क्या हो’, ‘चाँद को क्या मालूम’, ‘दिल लगा’,  ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ अशा अनेक बहारदार गीतांनी मैफलीचा समा बांधला. संगीत, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील रसिकांनी या पूर्ण मैफलीचा आस्वाद घेतला.

सिंफनीच्या कार्यक्रमाला रसिकांची भरगच्च उपस्थिती

या कार्यक्रमाचे संगीतसंयोजन आणि कीबोर्डवादन गृपचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी केलं. तबल्याची साथ विशाल पांडे, ऑक्टोपॅडची साथ सतीश मंडले, अॅकॉर्डियनची साथ गजानन देऊळकर, ढोलकीची साथ विनोद थोरात, गिटारची साथ शुभम मानकर, सेक्सोफोनची साथ अमित यांनी केली. ध्वनिव्यवस्था रॉयल साउंडचे रईसभाई सांभाळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.