वणीत दुस-या दिवशीही कोरोनाचा सिक्सर

आज तालुक्यात 9 रुग्ण, शहरात वाढतोय कोरोनाचा प्रकोप

0

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 2 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 7 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 6 रुग्ण हे वणी शहरातील आहेत तर तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात पुनवट, सुकणेगाव व पळसोनी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमुळे कोरोनाने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येचे आठवे शतक पार केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने ही एक चिंतेची बाब ठरू शकते.

Birthday

आज यवतमाळ हून 8 अहवाल प्राप्त झाले यातील 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 6 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. तर आज 36 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 7 संशयीत पॉजिटिव्ह तर 29 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 24 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 48 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 47 ऍक्टिव्ह रुग्ण

सध्या तालुक्यात एकूण 807 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 757 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 2 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात 47 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 20 जण होम आयसोलेट आहेत. 15 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 5 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

शहरात वाढतोय कोरोनाचा प्रकोप

गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काल नंतर आजही शहरात कोरोनाने सिक्सर मारला. एकीकडे दिवाळी जवळ येत असताना अचानक शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. शहरात ग्रामीण भागातून दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. जर शहरातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ही धोक्याची घंटा ठरू शकते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल

 

भावाने फोडलं बहिणीच डोकं….

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.