राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल

कोळसा कंपनीत राडा व मारहाण केल्याचे प्रकरण

1

जितेंद्र कोठारी, वणी: कोलारपिंपरी येथील खाजगी कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण व राडा केल्याप्रकरणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व इतर 5 जणांवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत.

कोलार पिंपरी कोळसा खाणीत माती उचलण्याचे काम सदभाव इंजिनिअरिंग लिमिटेड या खाजगी कंपनीकडे देण्यात आले. गुरूवार 5 ऑक्टो. रोजी रात्री 8.45 वाजता दरम्यान राजू उंबरकर हे पाच-सहा जणांसह सदर कंपनीच्या ऑफिसबाहेर येऊन शिवीगाळ करीत होते. कंपनीचे प्रबंधक राजकुमार रंनसीग बुरा यांनी उंबरकर यांना शिवीगाळ का करता असे विचारले.

उंबरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सकाळपर्यंत इथे दिसले, तर जीवानिशी मारून टाकीन अशी धमकी दिली. अशी तक्रार फिर्यादी राजकुमार रंनसीग बुरा (49 वर्ष) रा. सदभावना वसाहत, कोलारपिंपरी यांनी गुरुवारी रात्री वणी पो.स्टे. ला दिली.

तक्रारी वरून पोलिसांनी रात्री सव्वा तीन वाजता मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, नीलेश परगंटीवार, शेख अजीज, लकी सोमकुवर, धनंजय त्र्यंबके, दीपक व इतर तीन ते चार लोकांविरुद्ध कलम 452, 147, 149,188, 269, 284, 323, 341 व 506 भा.द.वि. अनव्ये गुन्हा दाखल केले. पुढील तपास पीएसआय गोपाल जाधव करीत आहे.

मराठी माणसावरील अत्याचार सहन करणार नाही

लॉकडाउन दरम्यान सदर कंपनीतील कामगार स्व:गावी परतले. तेव्हा कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कामावर घेऊन आपले कार्य भागविले. आता स्थानिक कामगारांना कोणतेही कारण नसताना कामावरून कमी करण्यात येत आहे. याचा जाब विचारायला गेलो असता प्रबंधक यांनी उद्धट भाषेत अरेरावी केली. माझ्या मराठी माणसांवर अत्याचार होत असताना मनसे गप्प बसणार नाही. यापुढे ही गरज पडल्यास आम्ही मुजोर अधिकाऱ्यांना असाच धडा शिकविणार.

राजू उंबरकर : महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

1 Comment
  1. […] राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल […]

Leave A Reply

Your email address will not be published.