आज 11 व्यक्ती पॉजिटिव्ह तर एकाचा मृत्यू

वणीत परिस्थिती गंभीर, सर्वसामान्यांमध्ये रोष....

0

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी वणीत कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आले आहेत. यात लक्ष्मी नगर 1, भालर 2, कैलास नगर 1, विठ्ठलवाडी 2, माळीपुरा 1, जैन ले आऊट 1, काळे ले आऊट 1, जुना कॉटन मार्केट 1, प्रगती नगर 1 असे रुग्ण आढळून आले आहे. तर यवतमाळ य़ेथे पाठवण्यात आलेल्या रिपोर्टमधले एकही रिपोर्ट आज प्राप्त झाले नाही.

आज एकाचा मृत्यू
आज रंगारी पुरा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे वय 60 वर्षे असून त्यांच्यावर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू होता. दिनांक 1 सप्टेंबर पासून उपचार सुरू असून आज त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सध्या तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती 251 असून त्यातील 171 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत तर 3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आज 32 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या परिसरात 77 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 46 रुग्ण कोविड केअर सेन्टरमध्ये तर 31 रुग्ण होम आयसोलेट आहे. यवतमाळ जीएमसी येथे 11 रुग्ण भरती आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.