पंचशील नगर, रांगणा, देशमुखवाडी, नांदेपेरा रोड येथे कोरोनाचा शिरकाव

आज तालुक्यात आढळले 18 रुग्ण, रंगारीपु-यात 5 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. आज तब्बल 18 रुग्ण आढळून आलेत. यात आरटीपीसीआर स्वॅब नुसार 15 तर ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत. आज पंचशील नगर, रांगणा, देशमुखवाडी, नांदेपेरा रोड येथे कोरोनाने शिरकाव केला आहे.

आज यवतमाळहून 61 रिपोर्ट आलेत. यात 15 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 46 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. पॉजिटिव्ह व्यक्तींमध्ये सर्वाधिक व्यक्ती रंगारीपु-यातील आहेत. रंगारीपु-यात आज 5 रुग्ण आढळून आलेत. त्यानंतर उकणी येथे 4 रुग्ण आढलून आलेत. राजूर येथे 2, नांदेपेरा रोड येथे 2, पंचशील नगर येथे 1, वसंत गंगा नगर 1 असे 15 रुग्ण आढळून आलेत.

आज 9 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 3 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आलेत. यात पद्मावती नगर येथील 1, देशमुख वाडी येथील 1, रांगणा येथील 1 रुग्णांचा समावेश आहे.

सध्या तालुक्यात 269 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 179 व्यक्तींनी कोरोनावर मात करून ते रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 88 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. 03 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आज 8 व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 8 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या कोविड सेंटरला 56 व्यक्तींवर उपचार सुरू असून 32 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 11 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 76 व्यक्ती भरती आहेत.

सलग तीन दिवसात तीन मृत्यू
वणीत रोज रुग्णसंख्या वाढत असल्याने परिसरात चिंता वाढत आहेत. त्यातच गेल्या चार दिवसात तीन मृत्यू झाल्याने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. आज 31 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून ते यवतमाळ य़ेथे पाठवण्यात आले आहे. अद्याप 250 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!