उन्हाळी 2020 परीक्षा संचालन कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना सूचना

विद्यापीठाच्या विविध प्राधिकारीणींच्या सभेत कार्यपद्धती निश्चित

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोविड -19 चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उन्हाळी 2020ची परीक्षा होऊ शकली नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांतर्गत अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा आयोजनासंदर्भात निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार परीक्षा घेण्यास कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विविध प्राधिकरिणींच्या सभेत मान्यता प्रदान करण्यात आली असून त्यानुसार परीक्षा होणार आहेत.

अंतिम वर्ष/ अंतिम सत्राच्या परीक्षा, याच विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेष सत्राच्या परीक्षा असे एकूण 70 हजार विद्यार्थी उन्हाळी 2020 ची परीक्षा देण्यास पात्र असून पाचही जिल्ह्यांतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता परीक्षा देण्याकरिता विद्यार्थ्यांकडे असलेली साधनसामग्री, महाविद्यालयाकडे असलेली साधनसामग्री व नवीन पद्धतीत प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी लागणारा वेळ, यावर विचार करून दिनांक 5 व 6 सप्टेंबर रोजी विद्या परिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ तसेच व्यवस्थापन परिषद या प्राधिकारिणींच्या तातडीच्या आभासी सभा संपन्न झाल्यात. त्या सभांमध्ये ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Podar School

सदर कार्यपद्धतीनुसार परीक्षा होतील. सविस्तर कार्यपद्धती सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. कार्यपद्धती विद्यापीठाची वेबसाईट www.sgbau.ac.in यावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, अभ्यागत आणि संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकांनी नोंद घेण्याचे आणि परीक्षा संचालन यशस्वीपणे पार पाडण्‍यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!