जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील माळीपुरा भागात आज सायंकाळी 5.00 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी धाड टाकून 11 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 95 हजार रोखसह 4 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, माळीपुरा येथील एका घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सतीश मंगल जाधव यांचे घरी धाड टाकली असता तिथे घरमालक सतीश जाधवसह इतर 10 जण 52 पत्याचे एक्का बादशाह गेम खेळताना आढळले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून रोख 95 हजार, 11 मोबाईल किमत 1लाख 3 हजार, मोटारसायकल 7 किंमत 2 लाख 80 हजार असे एकूण 4 लाख 78 हजाराचे मुद्देमाल जप्त केले.
पोलिसांनी आरोपी सतीश मंगल जाधव (31), अवि विठ्ठल सोनूले (25), ओमप्रकाश दिलीप मुले (32), राहुल केशव नागपुरे (31), प्रणय अनिल सुतसोनकर (24), सौरव मधुकर टोंगे (25), देवेंद्र विजय दिकोंडवार (25), राकेश बंडू ढवस (24), राहुल बंडू रोडे (26), महेंद्र शामदेव खाडे (33), व रुपेश देवराव गोडे ( 28) याच्या विरुद्द मुंबई जुगार प्रतिबंधक कलम 4,5 व भादवी कलम 269, 270 अनव्ये गुन्हा दाखल केले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पो. अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, पो.उ.नि. गोपाल जाधव, जमादार सुदर्शन वानोळे, ना.पो.का. सुनील खंडागळे, सुधीर पांडे, अमित पोयाम, दीपक वाडर्सवार, पंकज उंबरकर यांनी पार पाडली .