अंगावर वीज कोसळून शेत मजुराचा मृत्यू

वणी तालुक्यातील मोहदा येथील घटना

0
जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पो.स्टे. अंतर्गत मोहदा येथे बुधवारी दुपारी विजेच्या कडाक्यासह वादळी पावसादरम्यान अंगावर वीज कोसळून शेतमजुराची मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत शेतमजुराचा नाव सुरेश मडावी (55) रा. मोहदा आहे.

मोहदा येथील शेतकरी कवडू महाकुलकार यांच्या शेतात मशागतीच्या कामासाठी रोजंदारी मजूर म्हणून सुरेश मडावी काम करीत असताना दुपारी 4.00 वाजता दरम्यान आभाळ दाटले. थोड्यात वेळात विजेच्या कडाक्यासह पाऊस सुरू झाला. दरम्यान सुरेशच्या अंगावर वीज कोसळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटने बाबत मोहदा येथील पो. पाटील ज्ञानेश्वर डावे यांनी शिरपूर पोलिसांना माहिती दिली. मृतक सुरेश मडावीच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुलं असून रोजमजुरी करून उदरनिर्वाह करण्याऱ्या त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहचली असून मृतकाच्या प्रेताचा पंचनामा करून वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.