जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 39 रुग्ण आढळलेत. याआधी 9 सप्टेंबरला एकाच दिवशी 36 रुग्ण निष्पन्न झाले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी हा रेकॉर्ड तोडला गेला आहे. आज आलेल्या रुग्णांपैकी 31 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार तर 7 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 377 झाली आहे. आज विठ्ठलवाडीत तब्बल 10 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण बघून मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. शिवाय तीच व्यक्ती दुस-या वेळेस विना मास्क आढळल्यास त्या व्यक्तीवर गु्न्हा दाखल करण्यात येणार आहे. काल खासगी कोविड केअर सेंटरचे काम थांबवण्यात आल्यानंतर आज शेतकरी मंदिरद्वारा खासगी कोविड केअर सेंटर सुरू कऱण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. याशिवाय आज यवतमाळ येथे वणीतील एका प्रतिष्ठीत व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 72 वर्षांचे होते.
आज यवतमाळहून 102 अहवाल प्राप्त झाले. यात 31 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 71 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 25 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 17 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथे 10, कैलास नगर येथे 3, चिखलगाव 3, लक्ष्मी नगर 3, चिखलगाव 3, पळसोनी येथे 2, काळे ले आऊट, गौरकार ले आऊट, पेटूर, झोला, भालर, नायगाव, अर्जुनी, एकता नगर, नवीन वागदरा, साधनकर वाडी, ओम नगर, सदाशिव नगर, माळीपुरा, देशमुखवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागात 22 तर ग्रामीण भागात 17 रुग्ण आहेत. सध्या तालुक्यात 377 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 270 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 98 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 5 झाली आहे.
आज 15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 98 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 45 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 53 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 70 व्यक्ती भरती आहेत.
सावधान विनामास्क फिराल तर 500 रुपयांचा फाईन
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तसेच वाढते मृत्यू लक्षात घेऊन प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे जी व्यक्ती सार्वजिनिक ठिकाणी मास्क वापरणार नाही अशा व्यक्तींवर 500 रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. तर दुसऱ्या वेळेस विना मास्क आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, सदर कार्यवाहीचे आदेश पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आले आहे,