झरी तालुक्यात आणखी चार कोरोना रुग्णांची भर

लिंगटीत ३ तर येदलापूर येथे १ रुग्ण, वेडद येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील लिंगटी येथे ३ तर येदलापूर येथे एक रुग्ण असे ४ मिळालेत. तसेच वेडद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी तालुक्यात ४१ कोरोना रुग्णाच्या संख्येत चारने वाढ होऊन संख्या ४५ झाली आहे. लिंगटी येथे आरोग्यविभातर्फे गाव तपासणी करून लोकांचे नमुने पाठविण्यात आले होते.

तपासणीचे रिपोर्ट १० सप्टेंबरला प्राप्त झालेत. त्यात लिंगटी व येदलापूर येथील ४ रुग्ण पॉजिटिव्ह आल्याने ११ तारखेला आरोग्यविभागाने पॉजिटिव्ह रुग्णांना झरी येथे हलविले. तर गावातील १०० मीटरचा परिसर ब्लॉक करण्यात आला. येदलापूर येथील महिला ही मुकुटबन येथे राहते. वेडद येथे एकाच दिवशी १० पोजिटिव्ह रुग्ण मिळालेत. त्यातील एका रुग्णाचा चंद्रपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

तालुक्यातून मृत्यूच्या आकड्याला सुरवात झाली आहे. मृत्यूदर वाढू नये याकरिता जनतेलासुद्धा स्वतःची सुरक्षा करणे गरजेचे झाले आहे.
झरी तालुक्यातील ग्रामीण भागांतही कोरोनाचा प्रसार होत आहे. खेडेविभागही कोरोनाच्या लपेट्यात येणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाचे रुग्ण आयसोलेशन वॉर्डात हलविण्याकरिता आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. वेळेवर एमबुलन्सदेखील मिळत नाही. तर कधी १०८ नंबरवरून प्रतिसाद मिळत नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम हे आपल्या कर्मचार्यांना घेऊन धावपळ करीत असताना दिसत आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात गेडाम हे स्वतः आपले कर्मचारी घेऊन फिरतात व गावोगावी जनजागृती करतात हे विशेष.

झरीचे तहसीलदार रामचंद्र खिरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, मुकुटबन व पाटणचे ठाणेदार धर्मा सोनुने, अमोल बारापात्रे, उपनिरीक्षक युवराज राठोड, गणेश मोरे, आशा वर्कर व पोलीस कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे रुग्ण बचावकार्य व बंदोबस्त उत्कृष्ट सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.