चिंचोली गावात कोरोनाचे 2 रुग्ण, ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा

राजूर, घोन्सा, चिखलगाव, गणेशपूर नंतर आता चिंचोलीत प्रवेश

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी 6 रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा कोरोनाचे आणखी 8 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 5 रुग्ण तेली फैलातील व 1 रुग्ण रजा नगर येथील आहे. यात 3 महिला व 3 पुरुष आहेत. तर चिंचोली या गावात दोन रुग्ण आढळून आले आहेत. यातील चिंचोली व रजा नगर येथे आढळलेले रुग्ण हा नवीन सोर्स आहे. आज नवीन 8 रुग्ण आढळल्याने कोरोनाने फिफ्टी क्रॉस केली असून रुग्णांची एकूण संख्या 55 झाली आहे.

आज तालुक्यात नवीन साखळी तयार झाली आहे. यातील कोलगाव साखरा जवळ असलेल्या चिंचोली या गावात 2 रुग्ण आढळून आले आहेत. चिंचोली येथील रुग्णाच्या घरी 11 तारखेला घुग्गुसवरून रक्षाबंधनानिमित्त बहिण आली होती. त्यामुळे तिथून कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजूर, घोन्सा, गणेशपूर, चिखळगाव नंतर आता चिंचोली सारख्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. तर रजा नगर येथील रुग्ण हा बिहार वरून परत आला होता. परत आल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली असता तो पॉजिटिव्ह आढळून आला आहे.

आज वणी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 55 झाली असून यातील 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 आहे. यातील कोविड केअर सेन्टरमध्ये 14 व्यक्ती उपचार घेत आहेत तर 1 व्यक्ती यवतमाळ जीएमसी येथे उपचार घेत आहे. सध्या एकूण कंटेन्मेंट झोन 9 असून यातील 6 कन्टेन्मेन्ट झोन हे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा फास ग्रामीण भागात घट्ट् होताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.