आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

सध्या तालुक्यात 28 ऍक्टिव्ह रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: बुधवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 4 कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. आज आलेले सर्व रुग्ण हे चिखलगाव येथील आहेत. चारही रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 686 झाली आहे.

आज यवतमाळहून 44 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 40 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 15 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. आज 15 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप 44 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

तालुक्यात 28 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 686 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 658 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 28 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 20 झाली आहे.

आज 4 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली. सध्या 8 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 18 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 6 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 8 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.