आर्या इंटरनॅशनल व गुरुकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवले विशेष प्राविण्य...

0

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा 5 वी व पूर्व माध्यमिक परीक्षा इयत्ता 8 वी तील आर्या इंटरनॅशनल स्कूलच्या 8 विद्यार्थ्यांनी तर गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 5 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले आहे.

यात आर्या इंटरनॅशनल स्कूलचे जुनेद रशीद कच्छी, समीर देवानंद दुबे, सार्थक रामू रामेंलावार, शिव मनोज डब्बावार, श्रवंत श्रीनिवास धांडेकर, तन्वी संजय धांडे, वेद विनोद बोलकुंटवार, झोया रशीद कच्छी विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेही मारोती मेश्राम, सायली बालाजी मुद्दमवार, स्नेहा अनिल दुरलावर, समीक्षा शत्रुघ्न कुळसंगे आणि रुद्र विश्वास कोकमवार यांचा समावेश आहे.

आर्या इंटरनॅशनलचे विद्यार्थी….

आर्या इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक व शिक्षकांकडून करण्यात आला. गुरुकुल कॉन्व्हेंटच्या विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये, सर्व शिक्षकवृंद, आई वडील व शाळेच्या व्यवस्थापणाला दिले. या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांतर्फे सत्कार करण्यात आला.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.