सुशील ओझा, झरी: तालुक्यातील घोंसा, जुणोनी खडकडोह मार्ग झरी ते आनंतपुर मार्ग तेलंगणात प्रचंड प्रमाणात जनावर तस्करी वाढली आहे. याबाबत वणी विभागातील सर्वच पोलीस अधिकार्यापासून तर शिपायापर्यंत माहिती असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. ५ ऑक्टोबर रोजी पहाटे साडे चार वाजता दरम्यान मुकुटबन पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अमानुष व निर्दयपणे म्हशी चारचाकी गाडीत कोंबून तेलंगणात नेत आहे. यावरून घोंसा ते झरी रोडवरील खडकडोह गावाजवळील गणेश कृषी केंद्राजवळ नाकाबंदी लावून एकापाठोपाठ ४ चारचाकी वाहने आली. हे वाहने तपासल्या असता त्यात म्हशी आढळून आल्या.
म्हशीने भरलेले चारी वाहने क्रमांक एम एच २९एटी ०२५८ टाटा एस ऑपे, एम एच २० एटी ५५८ ट्रेक्स फोर्स पीक अप, एम एच २९ टी ३३०८ मॅक्स पिकअप, एम एच ४९ डी ३१८८ महिंद्रा बोलेरो पिकअप ह्या चारचाकी पोलीस स्टेशन ला जमा करून गाडी मालका व चालक शेख आरिफ शेख गुलाब २० वर्ष, इस्त्राईल खा रमजान खा ३१ जावेद खा अयुब खा २७, इलियास मुमताज खा ३६, इस्त्राईल मुमताज खा ३६, सय्यद रहेमान सय्यद कदर ३८ ,सय्यद ख्वाजा सय्यद नूरखा २३, सय्यद नवाब सय्यद गुलाब २६, शेख रशीद शेख मौला ३६, शेख अफसर शेख कासम २८, आबीद खा जब्बार खा ३५, सय्यद जीलानी रियाज अली ३८, शेख शब्बीर शेख जमाल ३२, महेबूब खा गुलाब खा , सर्व राहणार वणी यांना अटक केली.
सर्व म्हशी मुकुटबन येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे.४ चारचाकी ३१ म्हशी व नगदी व मोबाईल असा एकूण १५ लाख ७३ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून कलम ११ (१) (D),(E),(F), (H)R/w कलम १३०(१)१७७,१३०(३)१७७ मोवका R/w कलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला असून सदर कार्यवाही ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार ए एस आय शशिकांत नागरगोजे,रमेश ताजने, मोहन कुडमेथे,दिगंबर उपरे, सागर मेश्राम यांनी केली.