वणी: शहरातील गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव शांततेत पार पडण्याच्या हेतूने वणी वणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार,असामाजिक घटकाविरुद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवारी रात्री ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी धडक कारवाई मोहीम सुरू केली, यात विविध गुन्ह्यात असलेल्या 17 जणांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे,सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, दीपक वांड्रसवार, यांनी पहाटेच्या सुमारास या सराईत गुन्हेगार आणि असामाजिक तत्वांना ताब्यात घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.