पांढरकवडा शहरात आज आढळले कोरोनाचे 18 रुग्ण

पॉजिटिव्हची संख्या 144, शहरात दहशत

0

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवडा शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल शतक गाठल्यानंतर आज आणखी 18 कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 144 झाली आहेत. यातील 2 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण अचानक वाढत असल्याने सध्या शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या पांढरकवडा येथे 141 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील 135 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात ट्रमाकेअर, सामाजिक न्याय भवन व वन भवन आयसोलेट (अलगीकरण) करण्यात आले असून त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहे. तर 4 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. काल मेन लाईन व हनुमान वार्ड येथील 91 व्यक्तींचा स्वॅब घेण्यात आले व त्यांना होम कॉरन्टाईन करण्यात आले. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाचा वतीने दीनदयाल वार्ड, मस्जिद वार्ड, लोहार लाईन, मेन रोड व हनुमान वार्ड सिल करून त्याला प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले आहे.

पांढरकवडा ठरतोय विदर्भात हॉटस्पॉट
अवघ्या काही दिवसातच पांढरकवडा शहराने शंभरचा आकडा पार केला असून हा आकडा आता दिडशेच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे पांढरकवडा केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. शहरातील मस्जिद वार्ड हा हॉटस्पॉट असून हनुमान वार्ड परिसरात 9 रुग्ण आढळले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.