तालुक्यात कोरोनाचा हाहाकार, आज तब्बल 18 रुग्ण

रुग्णसंख्येने गाठला गेल्या काही दिवसातील सर्वोच्च आकडा

0

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचा हाहाकार दिसून आला. आज तब्बल 18 रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमधली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 8 तर ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळून आलेत. शहरातील विठ्ठलवाडी येथे 3, देशमुखवाडी येथे 3 तर प्रगतीनगर व गांधी चौक परिसरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. याशिवाय चिखलगाव येथे 4, गणेशपूर 1, भालर टाउनशिप 3, मुकूटबन 1 तर घुग्गुस येथील 1 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आला आहे.

शनिवारी यवतमाळ येथून 44 रिपोर्ट आलेत. यातील 10 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 34 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 21 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 8 पॉजिटिव्ह तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 21 संशयीतांचे स्वॅब आज यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 57 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 79 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1088 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 986 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 03 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 79 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 28 जण होम आयसोलेट आहेत. 32 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 19 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत तालुक्यात 23 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा: 

पान सेंटरवर पोलिसांची धाड, सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त

हे देखील वाचा: 

शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ जाब विचारणार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.