सकाळी आले यवतमाळहून, संध्याकाळी थेट आयसोलेशन वार्डमध्ये
मारेगावातील दोघे आयसोलेशन वार्डमध्ये
ज्योतिबा पोटे, मारेगाव: यवतमाळ येथे बंदोबस्ता निमित्त कर्तव्यावर असलेले दोघे मंगळवारी सकाळी यवतमाळ वरून मारेगावला परत आले. मात्र परत आल्याची माहिती होताच खबरदारी म्हणून त्यांना थेट मारेगाव येथील विलगिकरण कक्षात पाठवण्यात आले.
जिल्हात कोरोना रूग्नाचा आकडा शतका कडे वाटचाल करित असल्याने यवतमाळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे, अशातच मारेगाव येथील दोन युवक यवतमाळ येथे कर्तव्य बजावत होते. ते मंगळवारी मारेगावला परत आले. मारेगाव तालुक्यात कुणालाही कोरोना वायरसची बाधा होऊ नये म्हणून तहसील, आरोग्य व पोलीस विभाग आपले कर्तव्य बजावत आहे.
कोरोना वायरसच्या पार्श्वभूमिवर शहरात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापणे बंद आहे, अशातच बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर प्रशासनाची नजर आहे. दोघे यवतमाळहून परत आल्याचे कळताच संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्यांना मारेगाव येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मारेगाव येथे प्रशासनाने 200 खाटांचा आयसोलेसन वार्ड तयार केला आहे.
तहसिलदार दीपक पुंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांच पथक व मारेगांव पोस्टेचे पो.नि. जगदिश मंडलवार उपस्थित होते, तसेच दोन खेडेगावातील चौघांना देखील होम कॉरेन्टाईन करण्यात आल्याची माहिती तहसिलदार मारेगाव यांनी दिली आहे.