मारेगाव नगर पंचायत निवडणूक: नेत्याचा नेम करेल कोणाचा गेम?

निवडणुकी आधी सुरू झाले एकमेकांचे वस्त्रहरण

भास्कर राऊत, मारेगाव: नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जसा जाहीर झाला तसा हौसे, गौसे, नवसे यांचा वार्डामध्ये प्रचार आणि फिरणे सुरू झाले आहे. तर दुसरीकडे तिकीट आपल्यालाच मिळाले पाहिजे यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे. यासाठी इतरांपेक्षा आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे समजावून देण्याचा प्रयत्न युवा नेते करीत आहेत. तर काही इच्छुक इतर इच्छुकांची इमेज डॅमेज करून आपण कसे योग्य उमेदवार आहोत हे पटवून द्यायचा प्रयत्न करीत आहे. अशातच सर्वांना “हो” म्हणणारे नेते यावेळेस कोणावर नेम टाकून कोणाचा गेम करेल हे नामांकन परत घेतल्यानंतरच कळणार आहेत.

मारेगाव तालुक्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांचाच ज्वर दिसून येत आहे. नातेवाईकांपासून ते गल्लीबोळातील नेत्यांपर्यंत सर्वांनी आपल्याला सीट मिळावी यासाठी प्रयत्न चालवल्याचे दिसत आहेत. काही पक्षांकडून एकाच जागेसाठी दोन ते तीन दावेदार आहेत. पक्षश्रेष्ठींनी सर्वांनाच तयारीला लागा असे आदेश दिले. या सर्वांच्या दावेदारीने मात्र वस्त्रहरणाला सुरुवात झालेली असून त्याची झलक नुकतीच पहावयास मिळत आहेत. कोण कोणाचा वाली आणि कोण कोणाचा गॉडफादर हे कळायला अजून दोन दिवस बाकी आहेत.

काँग्रेसमध्ये तिकीटासाठी चढाओढ
काँग्रेस पक्षामध्ये स्वराज्य शेतकरी संघटनेचे विलीनीकरण झाल्याने काँग्रेस पक्षातील काही मातब्बर नेत्यांची मोठी गोची झालेली आहे. काहींना तर शांत बसावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. आता हे सर्व शांत बसतात की त्यांच्यातील नेता जागृत होतो हेही येणाऱ्या दोन तीन दिवसातच स्पष्ट होणार आहेत. परंतु हे मात्र खरे की कहीपे निगाहे कहीपे निशाणा हे मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येणार आहे.

7 डिसेंबर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक 8 डिसें रोजी सकाळी 11 वाजता पासून प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांना सोमवार दि. 13 डिसें. ला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. त्यानंतर लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार 21 डिसेंम्बर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येईल. दि. 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरवात करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा:

रंगारीपुरा येथे एका घरी लागली भीषण आग

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत

 

Comments are closed.