विवेक पिदूरकर, शिरपूर: शेतीच्या कामासाठी एका वृद्धेने बँकेतून पैसे काढले. मात्र एका भामट्याने त्यांचे सर्व पैसे लंपास केले. ही घटना कायर येथे घडली. दरम्यान हा भामटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शेतीच्या कामासाठी सध्या बँकेतून पैसे काढण्याची लगबग वाढली आहे. त्याचबरोबर काही भामटे देखील सक्रीय झाले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मंगला केशवराव कालेकर (65) या कायरपासून सुमारे 5 किलोमीटरवर असलेल्या नवरगाव येथील रहिवाशी आहे. त्यांचे कायरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अकाउंट आहे. सोमवारी दिनांक 28 जून रोजी त्या बँकेत पैसे काढण्यासाठी कायर येथे गेल्या होत्या. त्यांनी बँकेतून 20 हजार रुपये विड्रॉल केले व पैसे स्वत:जवळच्या पिशवीत ठेवले. मात्र त्यांच्यावर एक भामटा नजर ठेवून आहे हे त्यांना लक्षात आले नाही.
त्या पैसे घेऊन बस स्थानकावर गेल्या व तिथे बसून गाडीची वाट पाहत होत्या. दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवलेला भामटा तिथे आला व त्याने त्यांच्या पिशवीतील 20 हजार रुपये लंपास केले. दरम्यान काही वेळाने त्यांनी पिशवी चेक केली असता त्यांना पिशवीतील सर्व पैसे गायब असल्याचे आढळून आले.
मंगलाबाईंनी ताबडतोब शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गु्न्हा दाखल केला आहे. ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात जमादार अमोल कोवे करीत आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला भामटा
दरम्यान पैसे कुठे चोरीला गेला याबाबत तपासणी केली असता बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगलाबाईंनी पैसे पिशवीत ठेवल्याचे दिसत आहे. त्यानंतर बस स्थानकाजवळील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक भामटा त्यांच्या पिशवीतील पैसे चोरत असल्याची दिसून आल्याची माहिती मिळाली आहे. याआधारे भामट्याचा शोध सुरू आहे.
हे देखील वाचा: