नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. आरोग्य विभागाला 21 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कानडा गावात कोरोनाने एन्ट्री केली आहे. आज मारेगाव, कानडा, रोहपट, पिसगाव या चार गावात रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 22 झाली आहे.
आज आलेल्या रुग्णांमध्ये मारेगाव येथे 1 पुरुष,रोहपट 1 महिला, कानडा 1 पुरुष येथे एक तर पिसगाव येथील 2 महिला पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत. तालुक्यात एकूण 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यापैकी 29 रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेऊन बरे झाले तर जुने 17 तर आजचे 5 असे एकूण 22 ऍक्टिव्ह रुग्ण आहे.
21 सप्टेंबर रोजी मारेगाव, कानडा, रोहपट, पिसगाव या गावात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करणे व त्यांचे घराचा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालू आहे. आतापर्यंत तालुक्यात रॅपीड टेस्ट द्वारे 726 तर आरटी पीसीआर द्वारे 539 अशा एकूण 1265 व्यक्तीच्या टेस्ट घेण्यात आल्या आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)