आज 10 पॉजिटिव्ह, विठ्ठलवाडीत सर्वाधिक 3 रुग्ण

सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे कन्टेन्मेंट झोन उरले नावाला

0

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी तालुक्यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट नुसार आले आहे. तर 3 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 552 झाली आहे. दरम्यान शहरात कॉन्टेन्मेंट झोन केवळ नावाला उरल्याचे चित्र आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेक ठिकाणांचे कन्टेन्मेंट झोन साठी लावलेले बांबू काढून टाकले आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने कन्टेन्मेंट झोन केवळ नावालाच उरलेला असून त्यातून लोकांचा मुक्त वावर सुरू आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष पुरवणे गरजेचे आहे.

आज यवतमाळहून 36 अहवाल प्राप्त झाले. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 29 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 36 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 78 अहवाल येणे बाकी आहे. आज 9 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 3 पॉजिटिव्ह तर 6 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहे. सध्या तालुक्यात एकूण 552 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 434 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 99 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.

विठ्ठलवाडीत कोरोनाचे 3 रुग्ण
आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 5 रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळले. शहरात विठ्ठलवाडी येथे सर्वाधिक 3 तर रंगारीपुरा, जनता शाळा परिसर, व इतर ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव, गणेशपूर, नायगाव, शिंदोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

आज 19 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 19 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 99 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 39 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 60 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 17 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 55 व्यक्ती भरती आहेत.

नागरिकांनी लावला नियमांनाच ‘बांबू’
एकीकडे कोरोनाचे रुग्ण व मृत्यूसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांमधली कोरोनाबाबतची भीती निघाली असून खबरदारी म्हणून प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनला लावलेले बांबूच रहिवाशांनी उखडून टाकले आहे. सध्या हा प्रकार रंगनाथ नगर ताणाजी चौक येथे उघडकीस आला आहे. इथे एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळल्याने हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र परिसर सिल करण्यासाठी लावण्यात आलेले बांबूच स्थानिक रहिवाशांनी उखडून फेकले आहे. कन्टेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत स्थानिक रहिवाशी यातून मुक्त संचार करीत आहे. याआधी प्रगतीनगर येथील कन्टेन्मेंट झोनला लावलेले बांबू देखील स्थानिकांनी तोडल्याचे समोर आले होते.

प्रशासनास स्वयंसेवक किंवा गृहरक्षकांची गरज
गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून प्रशासन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिवाचे रान करून परिश्रम घेत आहे. मात्र आता ते देखील थकल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे नागरिकांचेही योग्य ती खबरदारी घेण्याकडे आधीसारखे लक्ष नाही. पोलीस विभाग व गृहरक्षक (होमगार्ड) विभागाकडे कन्टेन्मेंट झोनच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागाने ही कामगिरी चोखपणे बाजावलीही मात्र दिवसेंदिवस वाढणारे कन्टेन्मेंट झोन व अपुरे कर्मचारी यामुळे आता कन्टेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वारावर कोणताही सुरक्षा रक्षक नसतो. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून अपुरे मनुष्यबळ असेल तर स्वयंसेवकांची नियुक्ती करून किंवा गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेऊन कन्टेन्मेंट झोनसमोर सुरक्षा रक्षक ठेवणे शक्य आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.