आशासेविका आणि गटप्रवतर्क गेल्यात बेमुदत संपावर

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिरपूर पीएससीला निवेदन

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज दिनांक 21 सप्टेंबर सोमवारी शिरपूर पीएससी अंतर्गत येणा-या आशासेविका व गतप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या आहेत. राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत कोवि़ड 19 च्या सर्वेक्षणाचे काम सध्या ते करीत आहे. मात्र त्यांना अत्यल्प मानधन देण्यात असल्याचा आरोप असून मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत शिरपूर पीएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बोडखे यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक 15 सप्टेंबरपासून राज्यशासनातर्फे राज्यभरात कोविड 19 वर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंअंतर्गत आशासेविका व गटप्रवर्तकांकडे याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करणे, सर्वेक्षण करणे, प्राथमिक आरोग्य तपासणी करणे इत्यादी कामे दिली आहे. मात्र मानधनात वाढ करण्याचे जाहीर करून ही अद्याप वाढीव मानधन न मिळाल्याने  आशासेविका व गटप्रवर्तक  यांनी संपाचे  हत्यार उपसले आहे.

शासनाने 17 जुलै 2020 ला परिपत्रक काढून आशासेविकांना दरमहा 2 हजार रुपये तर गतप्रवर्तक यांना 3 हजारांची मानधनात वाढ केली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय आशासेविका व गतप्रवर्तक यांना सर्वेक्षणासाठी प्रतिदिन 300 रुपये भत्ता द्यावा. मिळणाऱ्या मानधना व्यतिरीक्त 1 रुपये अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता द्यावा. कोविड 19 विमा उतरविण्यात यावा अशा अनेक मागण्या यात आहे. अशा विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यभरातील आशासेविका व गटप्रवर्तक सध्या संपावर गेल्या आहेत.

निवेदन देते वेळी विना पाचभाई, छाया पिदूरकर, अर्चना नालमवार, संगीता वालकोंडे, मेघा कन्नाके इत्यादी आशासेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.