आज कोरोनाचे 12 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 564

एकता नगरमध्ये आज सर्वाधिक 4 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी तालुक्यात 12 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 11 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट नुसार आले आहे. तर 1 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आली आहे. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 564 झाली आहे.

आज यवतमाळहून 35 अहवाल प्राप्त झाले. यात 11 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 24 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 66 अहवाल येणे बाकी आहे. आज 14 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 पॉजिटिव्ह तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहे. सध्या तालुक्यात एकूण 564 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 449 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 96 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.

एकतानगरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण
आज आलेल्या 12 रुग्णांमधील सर्व रुग्ण हे शहरातील आहे. यात एकता नगर येथे सर्वाधिक 4 रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्र बँक जवळ 3, सदाशिव नगर, ओम नगर येथे प्रत्येकी 2 तर रजा नगर येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

आज 15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 96 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 46 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 50 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 19 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 54 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.