बुधवारी कोरोनाचे 5 रुग्ण, चिखलगावात कोरोनाचा उद्रेक

लॉकडाऊनचे नियम तोडणा-या 49 व्यक्तींवर कारवाई

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाची मंदावलेली रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. आज बुधवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे तब्बल 5 रुग्ण आढळून आलेत. हे पाचही रुग्ण चिखलगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 27 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी प्रशासनाची लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांवर कार्यवाही सुरूच आहे. आज तब्बल 49 व्यक्तींवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्याने दंड आकारण्यात आला आहे.

आज 19 संशयीतांच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 14 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 27 झाले आहेत. यातील 10 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 15 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

आज आलेल्या रुग्णांवरून 23 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज एकही अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1223 रुग्ण आढळून आलेत. यातील 1171 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज 49 व्यक्तींवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. आज 49 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 7 व्यक्तींवर मास्क न वापरल्याने तर 42 व्यक्तींवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांना प्रत्येकी 500 रुपये तर असा 3500 हजार रुपये तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यांकडून प्रत्येकी 200 रुपये असा 8400 रुपये असा एकूण 11900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हे देखील वाचा:

‘तिला’ झाली गर्भधारणा, तरीही ‘तो’ लग्न करेना

निमनी येथे रमाई घरकुल योजनेचा लाभ बोगस लाभार्थ्याला?

Leave A Reply

Your email address will not be published.