निमनी येथे रमाई घरकुल योजनेचा लाभ बोगस लाभार्थ्याला?

बोगस कागदपत्रांची पूर्तता करून लाभ घेतल्याचा आरोप

0

सुशील ओझा, झरी: शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच बोगस कागदपत्रांची पूर्तता करून निमनी येथे रमाई योजनेच्या घरकुलाचा लाभ घेतल्याची तक्रार करण्यात आली असून दोषींवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील आदिवासी बहुल निमनी गावात फकरू रामदास काटकर नामक व्यक्तीने रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे व त्यांचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम अतिक्रमण करीत रोडच्या हद्दीत सुरू असल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. फकरू काटकर नामक व्यक्तीचे गावात रहिवासी असल्याचे कागदपत्र नाही शिवाय गावातील मतदार यादीत नाव नाही. तरीपण त्याला घरकुल मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. 

बोगस घरकुल धारक यांना ग्रामपंचायतच्या काही पदाधिकारी सोबत संगनमत करून संपूर्ण कागदपत्र बोगस तयार केले व रमाई योजनेच्या घरकुलचा लाभ मिळवून देण्यात आल्याची आधी तक्रार करण्यात आली आहे. 

बोगस लाभार्थ्याला मदत करणारे पदाधिकारी व लाभार्थ्याची कसून चौकशी करून कार्यवाही करण्यात. अन्यथा अन्यथा पंचायत समिती समोर उपोषणास बसून असा इशारा मोहन कनाके, नरेंद्र वैद्य, सुरेश मिलमीले, राजू पळवेकर, दीपक निब्रड व श्रीराम शेडमाके यांनी निवेदनातून दिला आहे.

हे देखील वाचा:
Leave A Reply

Your email address will not be published.