अवैध रेती तस्करी करणारे २४ ट्रॅक्टर जप्त

सरपंच आणि गावकऱ्यांची कारवाई, महसूल विभाग झोपेत..

0

सुशील ओझा, झरी: झरी जामनी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले. सरपंच व धानोरा गावकर्यांनी ही कारवाई केली. रविवारी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी हे ट्रॅक्टर पकडले आहेत. मात्र महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

तालुक्यातील धानोरा ( लिंगटी ) पैनगंगा नदी पात्रातून  महाराष्ट्राच्या हद्दीतून मागील २ महिन्यांपासून खुलेआम महाराष्ट्रतील रेती सर्रास तेलंगणात वाळू तस्करी करीत महाराष्ट्राचा महसूल बुडवत आहे. यामुळे पैनगंगा नदी पात्रातील पाणी आटले. याचा मोठा परिणाम धानोरा गावातील जलस्रोतावर पडला आहे.

तर तेलंगणातील रेती तस्कर नदी पात्रातील रेतीसाठी 5 ते 6 फूट खड्डे करून रेती तस्करी करीत होते. या तस्करीवर झरीजामनी महसूल विभागाची मुकसंमती असल्याचे बोलले जात आहेत. रात्रं दिवस चालणाऱ्या रेती तस्करीला तेलनगणा प्रांतातील तस्कर महाराष्ट्रातील नदी पात्र हद्दीतून रेतीची चोरी करीत महाराष्ट्रचा महसूल बुडवित होते. तर याचा मोठा त्रास धानोरा गावकऱ्यांना होता.

यासंदर्भात सरपंच व गावकऱ्यांनी झरीजामनी महसूल विभागाला वेळोवेळी कळविण्यात आले होते यसेच तेलंगणातील रेती तस्करांना सुद्धा तंबी देण्यात आली होती. तरीही धनोरा रेती घटावरुंन रेती तस्करी जोमत सुरु होती. मात्र महसूल विभागाने कुठलीच कारवाई या तेलंगणा रेती तस्करवर केली नाही. यामुळे संतापलेल्या धानोरा गावकऱ्यांनी आज 15 एप्रिल ला सकाळी ८ वाजताच दरम्यान 24 तेलंगणाततील रेती तस्करला घेराव करून ताब्यात घेतले व झरीजामनी महसूल विभागाला पाचारण्यात आले. मात्र महसूल  विभागाने येण्यास दिरंगाई केले. केवळ महसूल चे तलाठी येरमे व मंडळ अधिकारी देशपांडे व पाटण पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी लष्करे घटनास्थळी येऊन गावकऱ्यांना सहकार्य केले.

विशेष म्हणजे तेलंगन्यातिल महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी लोकांचे मोबाइल नवम्बर या रेती तस्कराजवल असल्याने पुन्हा संशय वाढला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष माहरे व गवक्रयानी केलेल्या कामचे स्वागत होत आहे.

तेलंगणातील रेती तस्कर करणारी ट्रॅक्टर 24 ट्रॅक्टर ताब्यात घेतले. तर ट्रॅक्टर मालक व चालक संतोष गिरी, विलास चेनावार ,नारशिंग इंदूरवार, बाबू गाजभरे, सरदार बदाले, बाबूशिंग बदाले, रमेश तमालवर, रवींद्र संगेपवर, भगवान मदुलवर, चंदू नवघरे, विजय मडावी, अनवर खा पटाण, दिलीप पोतराजवर, दीपक आत्राम, नारायण रर्जनलवार, सुदर्शन पोतराजवर ,नरेंद्र ,गोविंदा आत्राम , जैशिंग ,दिलीप पोतराजवर , भारत धुर्वे ,सद्दाम शेख ,कैलास गोटमुकले ,खलील खा  हबीब खा ,राजू कस्तुरवर ,संतोष आवसकर,कृष्णां गोटमुखले ,लक्ष्मण मंजुळ ,संतोष गोडे ,अशोक अड्डरी ,नवीन यादव ,रामन्ना श्रीर्मन ,गंगाराम टापरे, विटल श्रीलंम ,संतोष सुर्यटळ  नारायण चेंदलवर  सर्व राहणार तेलनगणा ( आंध्रप्रदेश)  यांचेवर पाटण पोलीस व झरीजामनी महसूल विभागाने रेती चोरी प्रकरणी कारवाही करून सादर 24 ट्रॅकटर जप्त केले.

तर रेती तस्करी करणाऱ्या तेलंगणात रेती तस्करणा पकडण्यास धानोरा येथील सरपंच  वैशाली संतोष माहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली  व गावतील संतोष माहूरे ,अब्दुल ऊनिस ,संतोष वासाद, विकास पवार , संतोष ससनवर किशोर माहूर आधी गावकऱ्यांनी सहकार्य केले. सदर रेती घटनेवर ठानेदार शिवाजी लश्करे यानी आपला ताफा नेऊन सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.