गूड न्यूज… 15 रिपोर्ट निगेटिव्ह, 4 रिपोर्ट येणे बाकी

आणखी 6 व्यक्तींची विलगीकरण कक्षात रवानगी

0 4,547

जब्बार चीनी, वणी: काल वणीत सहावा रुग्ण सापडल्यानंतर आज सकाळी वणीकरांना गूडन्यूज मिळाली. यवतमाळला पाठवण्यात आलेल्या उर्वरीत 19 स्वॅब पैकी आज सकाळी 15 स्वॅबचा रिपोर्ट आला असून हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वणीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता आधी घेतलेल्या स्वॅबपैकी फक्त 4 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

जाहिरात

जाहिरात

काल पर्यंत एकून 59 लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले होते. त्यातील 55 जणांने रिपोर्ट आले असून यात 3 पॉजिटिव्ह 55 निगेटिव्ह व 4 जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहे. नागपूर येथे तपासणी केलेले 3 रुग्ण व यवतमाळ येथे तपासणी केलेले 3 असे एकून 6 कोरोनाचे रुग्ण वणीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जाहिरात

जाहिरात

काल संध्याकाळी कोरोनाचा सहावा रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 6 व्यक्तींना परसोड येथील कोविड केअर सेन्टरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले. आज दुपारी या सहाही व्यक्तीचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता आधीचे 4 व आजचे 6 रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यातील 4 रिपोर्ट आज संध्याकाळी येण्याची शक्यता आहे.

प्रातिनिधिक फोटो

संध्याकाळी 5 नंतर दुकान सुरू ठेवल्यास कारवाई – वैभव जाधव
सध्या वणीतील परिस्थिती गंभीर आहे. वणीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांना वारंवार मास्क लावून फिरण्याबाबत, वाहन डबलसीट न चालवण्याबाबत तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मात्र शहरात कोरोनाचे रुग्ण सापडूनही अनेक लोक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींवर कारवाई सुरू आहे. शिवाय संध्याकाळी 5 नंतर जे व्यापारी व व्यावासायिक दुकाने सुरू ठेवणार त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
– वैभव जाधव, ठाणेदार वणी पो.स्टे.

Comments
Loading...