वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, रुग्णांची संख्या 7

'हा' परिसर करण्यात आला सिल, वणीकरांची चिंता वाढली

0 15,875

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी कोरोनाने वणीकरांचे टेन्शन वाढवले. दोन दिवसांच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर आज वणीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वणीकरांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. आता वणीतील कोरोना रुग्णांची संख्या 7 झाली आहे. आज 9 जणांचे रिपोर्ट आलेत त्यातील 8 निगेटिव्ह तर एक पॉजिटिव्ह आला आहे. प्रशासनाने नवीन रुग्ण राहत असलेला परिसर सिल करण्यास सुरूवात केली आहे. सध्या या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्यास सुरूवात झाली असून संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तींना लवकरच कॉरेन्टाईन करण्यात येणार आहे.

आतापर्यंत वणीतील 68 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यातील 68 रिपोर्टही आलेले आहेत. रिपोर्टमध्ये 64 निगेटिव्ह तर  4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहेत. तर नागपूर येथे तपासणी केलेल्या वणीतील 3 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सध्या वणीतून कोरोनाचे 7 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. नवीन रुग्ण सापडल्याने आता आणखी एक नवीन चेन सुरू झाली आहे. नवीन रुग्णामुळे हाय रिस्क व्यक्तींची संख्याही वाढू शकते. 

सेवानगर परिसर सिल
कोरनाच्या रुग्ण सापडण्याच्या पार्श्वभूमीवर वणीतील सेवानगर हा परिसर सिल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. रुग्ण सापडल्याच्या लोकेशनपासून 250 मीटरच्या परिसर सिल करण्यात येणार असून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे.

परिसराची पाहणी करताना प्रशासकीय चमू

वणीकरांचे टेन्शन वाढले
आधी मोकळ्या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने संसर्ग पसरण्याचा धोका कमी होता. मात्र आता दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाच्या रुग्ण सापडला आहे. सेवानगर हा परिसर स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने वस्ती असल्याने परिसरातील नागरिकांसह वणीकरांचीही चिंता वाढली आहे.

Comments
Loading...