जब्बार चीनी, वणी: युवा मित्र मंच वणीच्या वतीने रविवारी दिनांक 7 जून रोजी धनोजे कुणबी सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 287 जणांनी रक्तदान केले. यात महिला रक्तदात्यांचा मोठा सहभाग होता. चंद्रपूर येथील शासकीय ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील रक्तसाठा संपला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी आपात्कालीन स्थितीत रक्ताची गरज पडल्यास तसा साठा उपलब्ध असावा यासाठी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वणतील युवा मित्र मंचच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरासाठी 400 रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. मात्र वेळेअभावी 287 रक्तदात्यांचेच रक्त घेता आले. रात्री उशिरापर्यंत रक्त संकलन करणे सुरू होते. महिला रक्तदात्यांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
दिग्गज राजकीय नेत्यांची सदिच्छा भेट
या शिबिराला खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, संजय देरकर, तारेन्द्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, विजय पिदुरकर, राकेश खुराणा, प्रमोद निकुरे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, विवेक मांडवकर, दिनकर पावडे, जयसिंग गोहोकार, बंडू येसेकर, धनंजय त्र्यंबके यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिपक रासेकर, शुभम पिंपळकर, शुभम गोरे, गीतेश वैद्य, अनिकेत चामाटे, शुभम इंगळे, सुमंत बचेवार, शंकर देरकर, संदीप गोहोकर, गौरव ताडकोंडावार, अभिषेक येसेकर, प्रसाद मत्ते, साई नालमवार, स्वप्नील बोकडे, सौरभ राजुरकर, आदित्य लेडांगे, आकाश घोडे यासह युवा मित्र मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.