3 गर्दुल्ये ताब्यात, पोलिसांची कारवाई

शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 31 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी रोडवरील एका बारच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात तीन गांजा ओढणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एनबीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हास पुरूषोत्तम उमरे (27) रा. पद्मावती नगर वणी, रवींद्र चरणलाल मरस्कोल्हे (34) रा. कोलार पिपरी, गणेश राजेंद्र चिंतलवार (31) रा. सदाशिव नगर वणी असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून तीन चिलम, गांजा पावडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्हात गांजा विक्री करणारे व ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गांजा ओढणाऱ्या अल्पवयीन बालकांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे. हा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांनी ही कारवाई केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तिन्ही आरोपींवर कलम 8 (सी) एनबीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अतुल मोहनकर, पोऊनी सुदाम असोरे, गजानन डोंगरे, विकास धडसे, विशाल गेडाम यांनी केली.

Comments are closed.