Lodha Hospital

मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव

आज शहरात आढळले 5 पॉजिटिव्ह

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज बुधवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी कोरोनाने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये शिरकाव केला आहे. याशिवाय आज शहरात 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आजच्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 65 झाली असून सध्या 11 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

पंचायत समिती, आरोग्य विभाग, महसूल विभाग यानंतर आता कोरोनाने पोलीस विभागात शिरकाव केला आहे. आज पॉजिटिव्ह आलेल्या 5 रुग्णांमध्ये मारेगाव पोलीस स्टेशन येथील कार्यरत 2 व्यक्तींचा समावेश आहे. यातील एक व्यक्ती अधिकारी तर एक कर्मचारी आहे. सध्या पॉजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू असून ते रुग्ण राहत असलेला परिसर सिल करणे सुरू आहे.

Sagar Katpis

तालुक्यात कोरोनाचे एकूण 65 रुग्ण झाले असून यातील 54 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 11 आहे. आता पर्यंत रॅपिड ऍन्टिजन टेस्टद्वारा 738 तर आरटीपीसीआर टेस्टनुसार 650 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!