कोरोनाचा उद्रेक सुरूच, आज 21 रुग्ण

होम आयसोलेशनमुळे रुग्णांना दिलासा, 25 पॉजिटिव्ह होम आयसोलेट

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल 16 रुग्ण आढळल्यानंतर आज कोरोनाचे तब्बल 21 रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे एकूण 196 रुग्ण झाले असून यात 22 रुग्ण इतर ठिकाणी (तालुक्याबाहेर) पॉजिटिव्ह आहेत. सध्या तालुक्यातील पॉजटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 174 आहे.

आज आरटी-पीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार करण्यात आलेले 26 रिपोर्ट यवतमाळहून प्रातप्त झाले. यात 20 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आल्यात तर 6 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 62 स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले. यवतमाळहून अद्याप 200 रिपोर्ट येणे बाकी आहे. आज दोन व्यक्तींचे रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आले यात 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे.

सध्या तालुक्यात एकूण 174 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. तर तालुक्यातील इतर भागात पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्ती या 22 आहेत. त्यामुळे कोरोनाचे एकूण रुग्ण हे 196 झाले आहेत. तालु्क्यातील 174 पॉजिटिव्ह व्यक्तीपैकी 93 व्यक्ती कोरोनामुक्त झालेत. तर सध्या 81 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये 37 व्यक्ती उपचार घेत असून यवतमाळ जीएमसी येथे 11 व्यक्ती उपचार घेत आहेत. सध्या चंद्रपूर येथे 2, नागपूर येथे 3, सावंगी मेघे येथे 1 व पांढरकवडा येथे 2 व्यक्ती उपचार घेत आहे.

शहरातील 25 व्यक्ती होम आयसोलेट
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने सशर्त होम आयसोलेशनला (अलगीकरण) परवानगी दिली. यात घरी पुरेशी व्यवस्था असणारे व कोरोनाचे सौम्य लक्षणं असणा-या व्यक्तींना ही सुविधा दिली जात आहे. सध्या तालुक्यातील 25 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. परसोडा येथे होणा-या गैरसोयीबाबत रुग्णांच्या सारख्या तक्रारी सुरू होत्या. तिथे असणा-या अस्वच्छतेबाबत रुग्णांनी व्हिडीओ देखील व्हायरल केले होते. मात्र आता होम आयसोलेशनची सुविधा मिळाल्याने रुग्णांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

रुग्णांची संख्येत सारखी भर पडत असल्याने सध्या कन्टेन्मेंट झोनमध्येही भर पडली आहे. सध्या तालु्क्यात 46 कन्टेन्मेंट झोन असून. यात ग्रामीण भागात 15 तर शहरी भागात 31 कन्टेन्मेंट झोन आहेत. दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाच्या रुग्णांमुळे सध्या परिसरातील नागरिकांची तर चिंता वाढली आहे शिवाय प्रशासनाचा ताण देखील वाढला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.