सावर्ला येथील युवक दोन दिवसांपासून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : मिस्त्री काम करणारा सावर्ला येथील युवक सोमवारी कामाकरिता वणीत आला. मात्र दोन दिवस उलटूनही तो घरी परतलाच नाही. संजय उद्धव चोपणे (35) रा. सावर्ला ता. वणी असा बेपत्ता युवकाचा नाव आहे. फिर्यादी राजू उद्धव चोपणे रा. सावर्ला यांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

Podar School 2025

संजय चोपणे हा विवाहित असून सावर्ला येथे आपल्या भावाच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. मिस्त्री काम करणारा संजय हा सोमवार 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान वणीत आला होता. मात्र 24 तास उलटून ही तो घरी परत आला नाही. गावात, वणी शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही त्याच्या काही पत्ता लागला नाही. त्यामुळे फिर्यादी भाऊ राजू चोपणे यांनी मंगळवार 12 सप्टेंबर रोजी रात्री वणी पोलीस स्टेशन येथे त्याचा भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

Comments are closed.