महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपये जमा

एसबीआई व त्याच्या सुविधाकेंद्रातून आजपासुन वाटप सुरू

0

जब्बार चीनी, वणी: प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर 500 रुपये जमा करण्यात आले आहे. पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जुन) प्रति महिना पाचशे रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत ही रक्कम जमा होणार आहे. त्यानुसार त्याच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे. महिलांचे ज्या बँकेत जनधन खाते आहे तिथे जाऊन त्यांना ते  पैसे काढता येणार आहे. एसबीआयमध्ये ज्या खाते क्रमाकांच्या शेवटी 0 किंवा 1 आहे त्यांना आज खात्यातील रक्कम काढता येत आहे.

केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे गरीबांचे मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आहेत. त्यांना त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकारने महिलांच्या जनधन खात्यांमध्ये तीन महिन्यांसाठी 500 रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात उघडण्यात आलेल्या जवळपास चार लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी पाचशे रुपये टाकण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

जिल्हातील राष्ट्रीयीकृत तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील जनधन खात्यात शासनाकडून गुरुवारी पैसे जमा करण्यात आले आहेत. परंतु हे पैसे काढताना महिलांना ठराविक दिवशीच बँकेत जाता येइल. शासनाने बँकेत गर्दी होवू नये यासाठी ग्राहक सेवा केंद्राची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनानुसारच पैसे काढावे लागणार आहेत.

खाते क्रमांकानुसार ठरविक दिवशीच मिळणार रक्कम

ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमाक 0 व 1 आहे, अशा महिलांना शुक्रवारी पैसे काढता येतील. तसेच ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक 2 आणि 3 आहे अशा महिलांना शनिवारी ता . 4 एप्रिल रोजी रक्कम काढता येइल. ज्यांच्या खात्यांचा शेवटचा क्रमांक 4 व 5 आहे, अशा खातेदारांना 7 एप्रिल रोजी, 6 व 7 क्रमांक असणा-यांना 8 एप्रिल रोजी. तर ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक 8 आणि 9 आहे अशा महिलांनी 9 एप्रिल रोजी बँकेतून पैसे काढता येणार आहे.

सरकारचे आदेश आणि आरबीआयने जी गाईडलाईन दिली आहे त्या गाईडलाईननुसार आम्ही सध्या काम करीत आहोत. बँकेत एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी ठरावीक तारखेला ठरावीक खातेदारांनाच रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे खातेदारांनी त्याच दिवशी बँकेत यावे. –  एम . आर . बोकडे, शाखा प्रमुख (प्रभारी) एसबीआय

Leave A Reply

Your email address will not be published.