झरी तालुक्यातील 80% आरो प्लान्ट बंद अवस्थेत

गावात अशुद्ध पाण्याचा पुरवठा... सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात

0

सुशील ओझा, झरी: लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावागावात आरो प्लान्ट लावण्यात आले आहेत. मात्र यातील सुमारे 80 टक्के प्लान्ट हे बंद अवस्थेत असल्याने सर्वसामान्यांना अशुद्ध व फ्लोराईडयुक्त पाण्याचे सेवन करावे लागत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे सरपंच सचिव व ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नेमकं  पाणी कुठे मुरत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेक गावात बोअरवेल हँडपम्प व विहिरी द्वारे पाणी पुरवठा होता. येथून मिळणारे पाणी अशुद्ध व फ्लोराइड युक्त आहे. जनतेला फ्लोराईड युक्त पाण्यामुळे होणाऱ्या आजारावर मात करून शुद्ध पाणी मिळावे याकरिता शासना कडून आमदार व खासदार निधीतून तालुक्यातील अनेक गावात आरो प्लांट लावण्यात आले. परंतु लावलेल्या आरो प्लांट मधील ८० टक्के आरो प्लांट बंद असून काही प्लांटचे काम अपूर्ण आहे.

कुठे लाईन कनेक्शन नाही तर कुठे इतर कारणामुळे प्लान्ट बंद अवस्थेत आहे. तालुक्यातील ४ ते ५ ग्रामपंचायत वगळता इतर सर्व गावातील आरोप्लान्ट बंद अवस्थेत असल्याने जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित राहून अशुद्ध पाण्याचे सेवन करावे लागत आहे. लाखो रुपये खर्च करून जनतेला शुद्ध पाणी मिळत नसेल तर आरो प्लांट लावून के उपयोग असा संतप्त प्रश्न जनता करीत आहे.

एक वर्षांपासून अनेक आरोप्लान्ट बंद असून ठेकेदारांच्या मेंटनन्स खर्च व कालावधी सुद्धा संपली आहे. या अशुद्ध पाण्यात सरपंच व सचिव यांचे हात ओले झाल्याचा आरोप नागरिक करीत आहे. याबाबत पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी अनेक ग्रामपंचायतला भेटी दिल्या व पाहणी केली असता बहुतांश ग्रामपंचायत मधील आरोप्लान्ट बंद असल्याचे आढळले.

सभापती यांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना एक वर्षापासून वारंवार कार्यवाही करिता सूचना दिल्या परंतु दोन्ही अधिकाऱ्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरत असल्याची चर्चा रंगत आहे. जीबीजीच्या मिटिंग मध्ये हा मुद्दा उचलून दोषी सरपंच सचिव यांच्यावर कार्यवाही करण्यास लावणार असल्याची माहिती गोंड्रावार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.