WWF: 75 वर्षांच्या आजोबांची 80 वर्षांच्या आजोबांना फाईट !

काठीने डोक्यावर प्रहार, आजीने मध्ये पडत 'वॉर' रुकवादी

बहुगुणी डेस्क, वणी: बालपणी लाईट – बुडा बुडीची फाईट असे बडबड गीत सर्वांनीच ऐकले असेल. अशीच एक घटना मारेगाव तालुक्यात समोर आली आहे. मारेगाव तालुक्यातल्या टाकळी (कुंभा) गावात दोन म्हातारे आजोबा अक्षरशः WWF फाईटच्या मोडमध्ये गेले! यातील एकाचे वय 75, तर दुसरे तब्बल 80 वर्षांचे ! एका आजोबाने दुस-या आजोबावर काठी उगारत हल्ला केला. याला कारणही शुल्लक होतं. नातवांच्या भांडणात आजोबा पडले आणि नातवांची फाईट होण्याऐवजी आजोबांचीच फाईट झाली. या प्रकरणी 75 वर्षांच्या आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महादेव चंदरु कोरवते (80) हे टाकळी (कुंभा) येथील रहिवासी आहे. त्यांच्या घराशेजारीच कवडू मारोती जुमनाके (75) हे राहतात. मंगळवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांचा नातू गावातल्या काही सवंगड्यांसह जगन्नाथ महाराज मंदिराजवळ खेळत होते. खेळताना त्यांच्यात मोठा आवाज सुरु होता.   

त्यामुळे महादेव हे काय झाले हे पाहण्यासाठी मंदिराजवळ गेले. त्यांनी खेळणा-या मुलांना मोठमोठ्याने आवाज का करता, असे म्हणत दरडावले. त्याच वेळी तिथे कवडू जुमनाके (75) हे बसून होते. यांनी महादेव यांना माझ्या नातवावर का रागवतोय, असा जाब विचारला. मात्र यातून वाद वाढत गेला. कवडू यांनी हातातील काठीने थेट महादेव यांच्या डोक्यावर प्रहार केला. दरम्यान तिथे महादेव यांच्या पत्नी जुमनाके आजी आल्या. त्यांनी ही फाईट सोडवली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आजोबांना ऑटोत बसवून दहेगाव येथील सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी उपचार करत “या वयात फाईट करू नका.” असा सल्ला दिला. यानंतर महादेव आजोबांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत कवडू आजोबांविरोधात गुन्हा दाखल केला. कवडू जुमनाके यांच्यावर BNS च्या कलम 118(1), 351(2), 351(3) नुसार नोंदवण्यात आला आहे. सध्या गावात या फाईटची चांगलीच चर्चा आहे.

वणीकरांनो, वीजबिलाचा त्रास संपवा — छतावर लावा सोलर प्लांट!

Comments are closed.