मुकुटबन येथे किराणा दुकानाची खिडकी तोडून 85 हजारांची चोरी

चोरट्यांनी चोरी करताना सोडला 'हा' क्ल्यू

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाची लोखंडी खिडकी (वेन्टीलेटर) तोडून दुकानात प्रवेश करून 85 हजार रुपये नगदी चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुटबन वणी मुख्यमार्गावर असलेल्या हाजी इकबाल कादर पटेल यांचे किराणा दुकान आहे. 11 ऑगस्टच्या रात्री किराणा दुकानाला शिडी लावून चोरटे वेन्टिलेटरजवळ पोहोचले. वेन्टिलेटरचे दोन गज तोडून त्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील ड्रॉव्हरमध्ये 85 हजार रुपये ठेवलेले होते. चोरट्यांनी नगदी 85 हजार रुपयांवर डल्ला मारत ही रक्कम लंपास केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दुकान मालक हाजी इकबाल यांनी दुकान उघडताच त्यांनी ड्रॉव्हर उघडून बघितले असता त्यात त्यांना रोख रक्कम आढळली नाही. त्यांनी दुकानाची पाहणी केली असता त्यांना खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम 380 व 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चोरी करताना झाली चोरट्यांकडून ‘ही’ चुकी
म्हणतात की चोरटा कितीही शिताफीने चोरी करत करत असला तरी एखादा क्ल्यू तो सोडून जातोच. या प्रकरणी दुकानात एक कलर चष्मा आढळून आला आहे. पोलिसांनी हा चष्मा जप्त केला असून त्यांनी या क्ल्यूचा उपयोग चोराचा शोध घेण्यासाठी होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्टला पाचारण केले आहे. त्यांची मदत घेऊन या गुन्ह्याची उकल करणे सुरू आहे.

मुकुटबन येथे कंपनी असल्याने तिथे हजारो परप्रांतिय कामगार आले आहेत. याचाच फायदा घेऊन काही लहान मोठे चोरटेही ऍक्टिव्ह झाले आहेत. याआधीही गावात लहानमोठ्या चो-या झाल्या आहेत. मात्र यावेळी ही चोरी मोठी होती. पोलिसांना या प्रकरणी क्लू मिळाला असून चोरट्यांना शोधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन कुडमेथे, रंजना सोयाम, सुलभ उईके, नीरज पातुरकर नहीम शेख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.