रेती तस्कराची मुजोरी… महसूल अधिकाऱ्याला “कट” मारून रेती तस्कर फरार

रेती तस्करावर वणी पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: अवैधरित्या रेती वाहतूक करून आणलेला ट्रक छोरिया ले आऊट मध्ये खाली होत असल्याची गुप्त माहिती वरून कारवाईसाठी गेलेले महसूल अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच वाहनाने कट मारून पळून जाणाऱ्या कुख्यात रेती तस्कर उमेश पोद्दार विरुद्द वणी पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त महितीनुसार वणी महसूल विभाग अंतर्गत गणेशपूर येथील मंडळ अधिकारी महेंद्र मुकुंदराव देशपांडे याना 21 मे राजी सायंकाळी 4.30 वाजता माहिती मिळाली की छोरिया ले आऊटमध्ये रंगनाथ रेसिडेन्सीच्या मागे अवैध रेतीचा ट्रक खाली होत आहे. सूचनेवरून मंडल अधिकारी देशपांडे व तलाठी बन्सीलाल सिडाम ताबडतोब घटनास्थळी पोहचले. तिथे एका निर्माणाधिन कॉम्प्लेक्सच्या खाली रेती भरलेला ट्रक क्र. MH34- M 3631 उभा होता. महसूल अधिकाऱ्यांनी ट्रक चालकास रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांनी माझ्याकडे कोणताही परवाना नाही असे सांगून माझे मालक उमेश पोद्दार येणार आहे, त्यांना विचारा असे उत्तर दिले.

संग्रहित फोटो

कारवाई सुरू असताना वणी येथील उमेश पोद्दार हे तिथे आला व महसूल अधिकाऱ्याच्या समोर ट्रकचा मागचा पल्ला खोलून रेती खाली केली. तसेच तुमच्या कडून जे होईल ते करून घ्या, मी तुम्हाला पाहून घेईल” अशी धमकी देऊन मंडळ अधिकारी देशपांडे व तलाठी सिडाम याला ट्रकने कट मारून पळून गेला.

महसूल अधिकाऱ्यांनी त्या क्षेत्रात टाकलेली अंदाजे 15 ब्रास रेती जप्त केली. तसेच गुरुवारी रात्री 10 वाजता रेती तस्कर उमेश पोद्दार व अज्ञात ट्रक चालक विरुद्द वणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. फिर्यादी मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उमेश पोद्दार (38) विरुद्द आईपीसी कलम 353, 506 व 34 अनव्ये गुन्हा दाखल केले आहे.

प्रकरणाची तपास सपोनि माया चाटसे करीत असून आरोपीच्या शोधात पोलीस पोद्दार यांचे घरी गेली असता तो मिळून आला नाही. अशी माहिती तपास अधिकारी यांनी दिली आहे.

हाच तो ट्रक

तहसीलदारांचे अजब तर्क
रेती तस्करी आणि महसूल अधिकाऱ्यांना धमकी बाबत तहसीलदार शाम धनमने यांना विचारणा केली असता, लोकांनी चोरीची रेती घेऊ नये, म्हणजे तस्करी आपोआप बंद होईल. असे अजब तर्क दिले. राज्यात यंदा रेती घाटांचे लिलाव रखडल्यामुळे खाजगीसह शासकीय बांधकामही ठप्प झाले आहे.

रेती तस्करांची मुसक्या आवळण्या पेक्षा “लोकांनी बांधकाम करू नये” अशी सल्लासुद्दा तहसीलदारांनी दिली. या मुळेच वणी तालुक्यात रेती तस्कर महसूल अधिकाऱ्यावर शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.