कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

झरी तालुका भाजप तर्फे तहसीलदार यांना निवेदन

0

सुशील ओझा, झरी: आज संपूर्ण देश कोविड- 19 विषाणूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतांना भारतातील सर्व राज्य युद्ध स्तरावर या विषाणूचा सामना करीत आपापल्या राज्याला सुरक्षित ठेवत आहेत. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार या विषाणूचा सामना करून महाराष्ट्राला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून या संकट काळात सरकारने युद्ध स्तरावर उपाययोजना करून राज्याला या संकटातून मुक्त करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करून या संबंधीचे निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली झरी तालुक्यातील पदाधिका-यांनी तहसिलदारांना दिले आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले कि, कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. केंद्रसरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टिका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे.

स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे,इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.

यावेळी सतिश नाकले (भाजपा तालुका अध्यक्ष), अशोकरेड्डी बोदकुरवार (भाजपा ज्येष्ठ नेते) राजेश्वर गोंड्रावार (सभापती पं.स. झरी), मिनक्षीताई बोलेनवार (जि. प. सदस्य), संगीताताई मानकर (जि.प.सदस्य), लताताई आत्राम (पं. स. उपसभापती झरी), प्रियाताई भोयर (महिला भाजपा अध्यक्ष झरी), अनील पोटे (माजी भाजपा तालुका अध्यक्ष), संजय दातारकर (आत्मा कमिटी अध्यक्ष) सुरेश बोलेनवार (बँक प्रतिनिधी) सुरेश मानकर (माजी पं.स.सदस्य) धर्मा आत्राम (माजी जि.प. सदस) अनिल पावडे (माजी सभापती कृ. उ.बा.समिती झरी) दत्तु चिंतावार, रमेश उदकवार, अरूण हिवरकर, श्रीकांत चामाटे, भाऊराव मेश्राम सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.